एसी लोकलचा १५ फेऱ्या रद्द झाल्याने गैरसोय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसी लोकलचा १५ फेऱ्या रद्द झाल्याने गैरसोय
एसी लोकलचा १५ फेऱ्या रद्द झाल्याने गैरसोय

एसी लोकलचा १५ फेऱ्या रद्द झाल्याने गैरसोय

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ३१ : पश्चिम रेल्वेच्या वातानुकूलित लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने दिवसभरातील १५ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. परिणामी, वातानुकूलित लोकलमधून नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली. वातानुकूलित लोकलच्या तिकीटदर कपातीनंतर प्रवाशांना मिळणारा प्रतिसाद पाहता पश्चिम रेल्वेने काही महिन्यांपूर्वी आठ नवीन वातानुकूलित लोकल फेऱ्या सुरू केल्या. सद्यस्थितीत पश्चिम रेल्वेवर वातानुकूलित लोकलची संख्या ७९ वर पोहचली. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे; मात्र गेल्या काही दिवसांपासून वातानुकूलित लोकलमध्ये तांत्रिक बिघाड होत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम रेल्वेवरील एका वातानुकूलित लोकलमध्ये बिघाड झाला. त्यामुळे दिवसभरातील १५ लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्या.