फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन बँक कर्मचाऱ्यांसह १६ जणांना अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या मालाड येथील एका व्यक्तीची ३४ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मोठ्या रकमेचे कमिशन मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून पीडितेला ई-कॉमर्स कंपनीत पैसे गुंतवण्यास सांगितले. तक्रारदाराने सुरुवातीला २६ लाख रुपयांची गुंतवणूक आरोपीने दिलेल्या बनावट ॲपच्या अर्जाद्वारे केली. त्याला अॅपवर मिळालेला ‘नफा’ दिसत असला तरी तो रक्कम काढू शकत नव्हता. नंतर त्याने पैसे काढण्यासाठी आरोपीला अतिरिक्त रक्कम दिली, परंतु महिना उलटूनही आरोपी न भेटल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि ऑगस्टमध्ये सायबर युनिटकडे तक्रार दाखल केली होती.
...
बँक कर्मचाऱ्यांशी संगनमत
भाईंदर येथून पाच आरोपींना अटक करून चौकशी केली असता त्यांना बनावट कागदपत्रांच्या मदतीने बँक खाते उघडण्यासाठी आणि सिम कार्ड देण्यासाठी पैसे दिले गेल्याचे कळले. त्यांना एकच खाते उघडण्यासाठी १०,००० ते १५,००० रुपये मिळत होते. अटक करण्यात आलेले बँक कर्मचारी वेगवेगळ्या संस्थांसाठी काम करत असून त्यांनी खाती उघडण्यासाठी आरोपींशी हातमिळवणी केली होती. या रॅकेटचा मास्टरमाईंड अजूनही फरारी असून ते विविध राज्यांतून रॅकेट चालवत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.