परिवहन बसेसच्या जागेसाठी पाहणी करून अहवाल सादर करा : आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांडगे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परिवहन बसेसच्या जागेसाठी पाहणी करून अहवाल सादर करा : आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांडगे
परिवहन बसेसच्या जागेसाठी पाहणी करून अहवाल सादर करा : आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांडगे

परिवहन बसेसच्या जागेसाठी पाहणी करून अहवाल सादर करा : आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांडगे

sakal_logo
By

कल्याण, ता. ३१ (बातमीदार) : कल्याण रेल्वे स्टेशनजवळील परिसरात एनएमएमटी आणि केडीएमटी बसेस कुठे उभ्या करायच्या याबाबत केडीएमटी, वाहतूक विभाग आणि एनएनएमटी विभागाच्या अधिकारी वर्गाने प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी संबंधित विभागाच्या अधिकारी वर्गाला दिले आहेत.

कल्याण पश्चिमेला रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या एसटी डेपोमध्ये स्मार्ट सिटीअंतर्गत विकास कामे सुरू झाली असून तेथे जागा कमी असल्याने एसटी महामंडळाने केडीएमटी आणि एनएमएमटी बसेसला बंदी घातल्याने त्या परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्न बिकट झाला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यात केडीएमटी, एनएमएमटी, स्मार्ट सिटी, पालिका, वाहतूक विभाग आणि आरटीओ अधिकारी वर्ग सहभागी झाला होता. या वेळी वाहतूक कोंडीबाबत चर्चा झाली. शहरातील रस्त्याच्या बाजूला असलेल्या भंगार आणि बेवारस वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने सर्वांनी एकत्र येऊन त्वरित कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले असून स्टेशन परिसर आणि शहरातील बेशिस्त आणि बेकायदा रिक्षांवर त्वरित आरटीओने कारवाई सुरू करावी, यामुळे स्टेशन परिसर काहीसा मोकळा होईल असे आदेश आयुक्तांनी या वेळी दिले. यामुळे आता संबंधित विभाग काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.