उरण शहरातील खेळाचे मैदानात कचऱ्याचे साम्राज्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उरण शहरातील खेळाचे मैदानात कचऱ्याचे साम्राज्य
उरण शहरातील खेळाचे मैदानात कचऱ्याचे साम्राज्य

उरण शहरातील खेळाचे मैदानात कचऱ्याचे साम्राज्य

sakal_logo
By

उरण, ता. ३१ (वार्ताहर) : शहरातील मुलांना खेळण्यासाठी आरक्षित केलेल्या एकमेव स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानावर सध्या कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. त्यात जास्तीत जास्त प्लास्टिक कचरा दिसून येत आहे. अत्यंत घाण व दुर्गंधीयुक्त झालेल्या या खेळाच्या मैदानाकडे मुलांनी पाठ फिरवली असून सध्या त्याला कचराकुंडीचे स्वरूप आले आहे.
उरण नगरपालिका हद्दीत फक्त स्वातंत्र्यवीर सावरकर हे एकच खेळाचे मैदान आरक्षित आहे. या मैदानावर विविध शालेय मैदानी खेळाच्या स्पर्धा, फुटबॉल, कबड्डी स्पर्धा यांचे आयोजन केले जाते. त्याचबरोबर शहरातील मुले या मैदानात नेहमी खेळण्यासाठी येतात. मात्र सध्या या मैदानावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. या कचऱ्यामुळे या मैदानावर मुले कसे खेळतील, अशी परिस्थिती दिसून येत आहे.
संध्याकाळ होताच या मैदानात दारुडे व गर्दुल्‍ले आपले बस्तान मांडतात. पर्यायाने दारूच्या रिकाम्या बाटल्या मैदानातच फोडून फेकून दिल्या जातात. मैदानात सर्वत्र काचा पसरलेल्या असतात. कचऱ्याची विल्हेवाट लावून दारुड्यांसाठी हे मैदान बंद करण्यात यावे, अशी मागणी नागरिक करत आहे.


आम्ही फटाके स्टॉल लावण्यासाठी दिले होते. त्याचा कचरा असू शकेल. आता मैदानाची पाहणी करून तेथील स्वच्छता करण्यास सांगतो.
- राहुल इंगळे, मुख्याधिकारी