माथेरानच्या राणीचा अपघात टळला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माथेरानच्या राणीचा अपघात टळला
माथेरानच्या राणीचा अपघात टळला

माथेरानच्या राणीचा अपघात टळला

sakal_logo
By

मुंबई, ता. ३१ : नेरळ ते माथेरानदरम्यान धावणाऱ्या मिनी ट्रेनच्या रेल्वे मार्गावर अज्ञान व्यक्तीकडून रेल्वे रुळावर रुळाचा तुकडा टाकल्याने मोठा अपघात होणार होता; मात्र लोको पायलटच्या सतर्कमुळे अनर्थ टळला. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार रविवारी रेल्वे रुळावर अज्ञात इसमाने रुळाचा तुकडा मार्गात ठेवला होता, पण लोको पायलट दिनेश चंद मीणा, सहायक लोको पायलट सुधांशू पी. यांनी माथेरानवरून नेरळकडे परत येत असताना सायंकाळी ५.३५ वाजता रेल्वे रुळावरील लोखंडी तुकडा पाहून प्रसंगावधान दाखवत गाडी उभी केली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दोघांचे या उल्लेखनीय कार्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. यासंदर्भात मध्य रेल्वेकडून चौकशी केली जात आहे.