चार रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चार रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार
चार रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार

चार रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार

sakal_logo
By

मुंबई, ता. ३१ : कसारा, नेरळ, कांदिवली आणि मिरा रोड अशा चार रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. येत्या दोन वर्षांत या चारही स्थानकांच्या पुनर्विकासाचे काम एमयूटीपी ३ अ अंतर्गत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून देण्यात आली आहे.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून पश्चिम व मध्य रेल्वेवरील १९ उपनगर रेल्वे स्थानकांचा विमानतळाच्या धर्तीवर विकास करण्यात येणार होता; मात्र कोरोनामुळे काही वर्षांपासून विकासाची कामे रखडली आहेत. विशेष म्हणजे या स्थानकांचा पुनर्विकास करण्यासाठी सुमारे ९४७ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळालेली आहे; मात्र या निधीचा वापर अद्यापही होताना दिसून येत नाही. १९ रेल्वे स्थानकांमध्ये मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील भांडुप, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, शहाड, नेरळ आणि कसारा अशी एकूण ७; तर हार्बरवरील जीटीबीनगर, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द अशा चार स्थानकांचा समावेश आहे. पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल, जोगेश्वरी, कांदिवली यासह एकूण आठ स्थानके अशा एकूण १९ रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे.
...
असा होणार पुनर्विकास
कांदिवली, मिरा रोड, कसारा आणि नेरळ या चार स्थानकांच्या पुनर्विकासाच्या कामाला सुरुवात होणार आहे. स्थानकांमध्ये सुधारणा करताना प्रशस्त डेक, पूर्व-पश्चिम जोडणारे पूल, प्रवासी मागणीनुसार तिकीट खिडक्या आणि अन्य प्रवासी सुविधांचा समावेश आहे.