लोकप्रतिनिधींच्या संरक्षणावरील वारेमाप खर्च बंद करावेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोकप्रतिनिधींच्या संरक्षणावरील वारेमाप खर्च बंद करावेत
लोकप्रतिनिधींच्या संरक्षणावरील वारेमाप खर्च बंद करावेत

लोकप्रतिनिधींच्या संरक्षणावरील वारेमाप खर्च बंद करावेत

sakal_logo
By

टिटवाळा, ता. १ (बातमीदार) ः लोकशाही राज्यव्यवस्थेत ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी प्रशासनाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणे अपेक्षित आहे. कारण व्यापक समाजहिताचे रक्षण करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची असते; मात्र सध्या याच्या विपरीत चित्र दिसू लागले आहे. लोकांनी निवडून दिलेले हे लोकप्रतिनिधी अहोरात्र शस्त्रधारी बंदोबस्त घेऊन वावरत असतात. जनतेच्या पैशांचा हा अपव्यय त्वरित थांबवावा, असे मत आमदार किसन कथोरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
काही वेळा एखाद्या लोकप्रतिनिधीने घेतलेल्या कठोर निर्णयांमुळे दुखावलेल्या समाज कंटकांकडून त्यांच्या जीवितास धोका संभवू शकतो. अशा परिस्थितीचे नीटपणे अवलोकन करून त्याला संरक्षण दिले, तर ते उचित होईल; परंतु सध्या कोणीही अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना असलेल्या पोलिस संरक्षणाची कवचकुंडले धारण करतो, ते चुकीचे आहे. ते टाळण्यासाठी पोलिस संरक्षणाचे नियम कडक करावेत. त्याची सुस्पष्ट आचारसंहिता ठरविण्यात यावी. त्या आचारसंहितेचे काटेकोर पालन करूनच पोलिस संरक्षण देण्यात यावे, असेही आमदार कथोरे यांनी सांगितले.