मागील सरकारने किती उद्योग आणले? मनसे आमदाराची मविआ सरकारवर टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray Raju Patil
मागील सरकारने किती उद्योग आणले?

मागील सरकारने किती उद्योग आणले? मनसे आमदाराची मविआ सरकारवर टीका

sakal_logo
By

कल्याण: सध्याचे काही मंत्री हे ठाकरे सरकारमध्येही मंत्री होते. त्यामुळे एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा मागील सरकारने किती उद्योग आणले, असा सवाल मनसे आमदार राजू पाटील यांनी केला आहे. मनसे आमदार राजू पाटील यांच्या आमदार निधीतून करण्यात आलेल्या काटई गावातील वातानुकूलित व्यायामशाळेचे उद्‌घाटन करण्यात आले.

तसेच निळजे आणि देसलेपाडा येथील रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. वेदांता-फॉक्सकॉन त्यानंतर टाटा एअरबस हे प्रकल्प महाराष्ट्रामधून गुजरातला गेले आणि त्यानंतर महाराष्ट्रात एकच राजकारण पेटले आहे.

महाविकास आघाडी आणि शिंदे-फडणवीस सरकार यांच्यामधील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. राज ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार हे उद्योग का जातात आणि एकाच राज्यात का जातात, यांचे संशोधन करायला हवे, असे खोचक विधान आमदार राजू पाटील यांनी केले.