चिंचणी परिसरात डोळ्यांची साथ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिंचणी परिसरात डोळ्यांची साथ
चिंचणी परिसरात डोळ्यांची साथ

चिंचणी परिसरात डोळ्यांची साथ

sakal_logo
By

डहाणू, ता. १ (बातमीदार) : तालुक्यातील चिंचणी, ओसरवाडी, वाणगाव, वाढवण, वरोर येथील नागरिक डोळे येण्याच्या साथीने हैराण झाले आहेत. या परिसरात गेल्या पंधरा दिवसापासून डोळे येण्याचा संसर्ग पसरू लागला असून डोळ्याला सूज येणे, डोळ्यात आग होणे, डोळे लाल होणे, डोळ्यातून पाणी येणे अशी काहीशी लक्षणे दिसून येत आहेत; तर हवामान बदलामुळे वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. यामुळे संसर्गाच्या प्रसारास पोषक वातावरण निर्माण झाल्याने डोळे येण्याचे प्रकार वाढत असून नागरिकांनी योग्य खबरदारी घ्यावी, असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.