मनसेच्या तक्रारीनंतर पोलिसांची अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनसेच्या तक्रारीनंतर पोलिसांची अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई
मनसेच्या तक्रारीनंतर पोलिसांची अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई

मनसेच्या तक्रारीनंतर पोलिसांची अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई

sakal_logo
By

घाटकोपर, ता. १ (बातमीदार) ः मनसेने अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासंदर्भात दिलेल्‍या निवेदनानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली आहे. आज (ता. १) सकाळी घाटकोपर पोलिसांनी स्टेशन रोडजवळील खोत लेन मार्गावरील फेरीवाल्यांवर कारवाई करत नेहमी गजबजलेला रस्ता मोकळा करून दिला. दरम्‍यान पोलिसांच्या या कारवाईनंतर पुन्‍हा फेरीवाल्‍यांनी बस्‍तान मांडल्‍यास पोलिस काय करणार असा सवाल नागरिकांनी केला आहे.
घाटकोपर पश्चिमेकडील महात्मा गांधी रोड, खोत लेन, जयप्रकाश रोड येथे संध्याकाळच्या दरम्यान प्रचंड गर्दी होत असल्याने वाहतूक व सामान्य प्रवाशांना चालणे कसरतीचे होते. त्यात शेअर रिक्षा स्टँड व फेरीवाल्‍यांचे अतिक्रमण यामुळे येथून ये–जा करणे कठिण झाले होते. त्‍यातच फेरीवाल्यांची दादागिरी सुरू झाल्‍याने येथे दहशतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत मनसेचे माजी शाखाध्यक्ष राजू सावंत यांनी सोशल मीडियाद्वारे अनधिकृत फेरीवाल्यांना सावधतेचा इशारा दिला. तसेच पोलिसांना कारवाई करण्याची मागणी केली. त्‍यावर घाटकोपर पोलिसांनी कारवाई करत खोत लेन मार्ग मोकळा केला.