म्हसरोली येथे शालोपयोगी भेटवस्तू, फराळाचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

म्हसरोली येथे शालोपयोगी भेटवस्तू, फराळाचे वाटप
म्हसरोली येथे शालोपयोगी भेटवस्तू, फराळाचे वाटप

म्हसरोली येथे शालोपयोगी भेटवस्तू, फराळाचे वाटप

sakal_logo
By

विक्रमगड, ता. १ (बातमीदार) : शिव भवानी सेवा ट्रस्ट विरार- पूर्व यांच्यामार्फत, ग्रुप ग्रामपंचायत म्हसरोली/वडपोली अंतर्गत जिल्हा परिषद शाळा धोदडेपाडा, ता. विक्रमगड येथे आदिवासी विद्यार्थ्यांना शालोपयोगी भेटवस्तू, फराळ व कपडे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना व त्यांचा पालकांना कपडे, महिलांना साड्या, फराळवाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विक्रमगड पंचायत समिती उपसभापती नम्रता गोवारी, ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीणजी पाटील, म्हसरोलीचे सरपंच समीर धोदडे, केवचे सरपंच विलास घाटाळ, ट्रस्टचे पदाधिकारी मुकुंद जगताप, तानाजी पवार, राजेश माने, आर्यन पाटील, संदीप भारती, सागर पाटील, बलिराम चव्हाण, प्रमोदजी भोईर, जितेन्द्र पवार, महेंद्र पाटील, नकुल धोदडे, दुर्वास पवार तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.