हौदात पडून ६ वर्षीय मुलाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हौदात पडून ६ वर्षीय मुलाचा मृत्यू
हौदात पडून ६ वर्षीय मुलाचा मृत्यू

हौदात पडून ६ वर्षीय मुलाचा मृत्यू

sakal_logo
By

ठाणे, ता. १ (वार्ताहर) : बाळकूम परिसरातील यशस्वी नगर परिसरात म्हाडाच्या बंद पडलेल्या इमारतीच्या बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी असलेल्या पाण्याच्या हौदात पडून बबलू कुमार भुज्या (वय ६) या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी कापूरबावडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बबलू कुमार हा कुटुंबासह यशस्वीनगर येथे सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी आपल्या परिवारासह राहत होता. या प्रकल्पाचे बांधकाम बंद असल्याने या ठिकाणी सुरक्षारक्षक किंवा सुरक्षेची काहीच उपाययोजना नव्हती. सोमवारी संध्याकाळी बबलू हा शौचास गेला होता. बराच वेळ घरी परत न आल्याने त्याचा शोध घेण्यात आला. रात्री उशिरा बबलूचा मृतदेह हा पाण्याच्या हौदात पडलेला आढळला. त्याला त्वरित बाहेर काढून ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी कापूरबावडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.