पक्षभेद विसरून गावचा विकास करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पक्षभेद विसरून गावचा विकास करा
पक्षभेद विसरून गावचा विकास करा

पक्षभेद विसरून गावचा विकास करा

sakal_logo
By

जव्हार, ता. १ (बातमीदार) : ज्याप्रमाणे परमेश्वराच्या दर्शनासाठी जाताना आपण आपली पादत्राणे काढूनच आतमध्ये जातो, त्याप्रमाणे आपण निवडून आल्यानंतर सरपंच, उपसरपंच म्हणून ग्रामपंचायतीच्या कार्यालयात बसल्यानंतर राजकीय पादत्राणे बाहेर काढूनच कारभार करावा. पक्षभेद विसरून गावचा विकास करा, असे आवाहन आमदार सुनील भुसारा यांनी जव्हार तालुक्यातील नवनियुक्त सरपंच आणि उपसरपंच यांना केले आहे.
जव्हार पंचायत समितीकडून नूतन सरपंच आणि उपसरपंच यांच्याशी संवाद साधण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार भुसारा बोलत होते. राजकारण हे निवडणुकीपुरतेच असते. या भागाचा आमदार म्हणून मी सदैव आपल्यासोबत असल्याचा विश्वास भुसारा यांनी या वेळी व्यक्त केला. आज राज्यात अनेक आदर्श ग्रामपंचायती आहेत, त्याचप्रमाणे आपली ग्रामपंचायत व्हावी, यासाठी प्रयत्न करा. जे नवीन सरपंच, उपसरपंच आहेत, त्यांनी अभ्यास करून कारभार करावा, असे आवाहन या वेळी भुसारा यांनी केले.
या वेळी गटविकास अधिकारी समीर वठारकर, ग्रामविस्तार अधिकारी सुनील पाटील, पाणीपुरवठा अधिकारी सर्व सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक उपस्थित होते.