डॉ. अमेय पाटील यांना दंत चिकित्सेसाठी अमेरिकेत सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. अमेय पाटील यांना दंत चिकित्सेसाठी अमेरिकेत सन्मान
डॉ. अमेय पाटील यांना दंत चिकित्सेसाठी अमेरिकेत सन्मान

डॉ. अमेय पाटील यांना दंत चिकित्सेसाठी अमेरिकेत सन्मान

sakal_logo
By

कासा, ता. १ (बातमीदार) : अमेरिकेच्या इंटरनॅशनल कॉलेज ऑफ डेंटिस्ट विभागाने डॉ. अमेय पाटील यांचा दंतचिकित्सेच्या सेवेसाठी सन्मान केला. त्यांचे मूळ गाव डहाणू तालुक्यातील वाणगावनजीक आसनगाव असून शिक्षण वसई तालुक्यात झाले. आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या या पालघर जिल्ह्यातील तरुणावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अमेरिकेतील ह्युस्टन, टेक्सास येथे आयोजित केलेल्या ८८ व्या वार्षिक दीक्षांत समारंभात डॉ. अमेय पाटील यांचा फेलो म्हणून समावेश केला असून यानिमित्ताने पुरस्कार प्रदान करण्यात आला. दंतचिकित्सेच्या विशिष्ट सेवेसाठी त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. नोकरीनिमित्त डॉ. अमेय पाटील यांचे पालक वसई तालुक्यात स्थायिक झाल्यानंतर तेथेच त्यांनी शिक्षण घेतले; तर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातून दंतशस्त्रक्रिया पदवी पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी अमेरिकेत या विषयीचे उच्च शिक्षण घेतले. ते सिस्टोरीव्ह दंतचिकित्सा विभागात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. नेवार्क अमेरिकेच्या डायग्नोस्टिक सायन्सेस सेंटर फॉर ओरोफेशियल पेन अँड टीएमजे येथे सामान्य दंतचिकित्सा संकल्पनाचे ते संचालक आहेत. याखेरीज विविध वैद्यकीय संस्थेत ते सेवा देत आहेत.