मालवणीतील स्‍मशानभूमीची दुरवस्‍था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालवणीतील स्‍मशानभूमीची दुरवस्‍था
मालवणीतील स्‍मशानभूमीची दुरवस्‍था

मालवणीतील स्‍मशानभूमीची दुरवस्‍था

sakal_logo
By

मालाड, ता. १ (बातमीदार) ः मालाड पश्चिमेतील मालवणीत असलेल्‍या हिंदुस्थान स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. या स्मशानभूमीत मूलभूत सुविधांची वानवा असल्‍याने अंत्‍यविधीसाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय होत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
स्‍मशानभूमीत असलेले बाथरूम दयनीय स्थितीत आहेत. सर्वत्र घाण पसरली असून छताचीही पडझड झाली आहे. येथील जलवाहिनींचे नळही गायब झालेले आहेत. तसेच अंत्‍यविधीसाठी येणाऱ्यांच्या सोयीसाठी असलेली आसने तुटली आहेत. सोबतच सुशोभीकरण केलेल्या चौकाचीही दुरवस्था झाली आहे.

स्मशानभूमीची माहिती मिळताच आम्ही त्वरित दुरुस्ती सुरू करू. आमच्याकडे निधी उपलब्ध झाला आहे.
– किरण दिघावकर, सहायक पालिका आयुक्त, पी-उत्तर विभाग

स्मशानभूमीची दुरुस्ती त्वरित करण्याची गरज आहे. पालिका प्रशासनाने याबाबत ठोस उपाय करावेत. तसेच सर्वच स्मशानभूमींबाबत धोरणात्मक उपाययोजना करायला हव्‍यात.
– कृष्णा वाघमारे, रहिवासी