वैश्य समाज संस्कार शिबिराचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वैश्य समाज संस्कार शिबिराचे आयोजन
वैश्य समाज संस्कार शिबिराचे आयोजन

वैश्य समाज संस्कार शिबिराचे आयोजन

sakal_logo
By

सरळगाव, ता. १ (बातमीदार) ः ठाणे-पालघर जिल्हा महाराष्ट्रीय वैश्य संघाच्या तीनदिवसीय संस्कार शिबिराची सुरुवात झाली आहे. या शिबिरात १५० विद्यार्थी सहभागी झाले आहेत. विद्यार्थ्यांवर योग्य वयात संस्कार व्हावेत, त्याच्यातील उपजत व सुप्त गुणांना वाव मिळावा, स्वच्छतेचे, चांगल्या दैनंदिन सवयीचे व व्यायामाचे महत्त्व त्यांच्या बालमनावर बिंबवावे, या दृष्टीन शिबिराचे आयोजन ४० वर्षांपासून केले जाते, अशी माहिती या शिबिराचे सभापती जगदीश गंधे यांनी दिली. या शिबिरात प्रार्थना, योगासने, विविध सांघीक खेळ, वक्तृत्व, गायन, कथा, हॉर्स रायडिंग, रायफल शूटिंग, कराटे, एकत्र रहाणे, स्वावलंबन, जंगल सफारी याचा समावेश होता. हे शिबिर दहागाव येथील निसर्गरम्य अशा ठिकाणी आयोजित केले आहे. रायफल शूटिंग व घोडेस्वारीचे प्रशिक्षण नंदकुमार दलाल यांनी दिले. या शिबिराचा समारोप बुधवारी (ता. २) होणार आहे.