मुरबाडमध्ये लम्पी रोगाने बैलाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुरबाडमध्ये लम्पी रोगाने बैलाचा मृत्यू
मुरबाडमध्ये लम्पी रोगाने बैलाचा मृत्यू

मुरबाडमध्ये लम्पी रोगाने बैलाचा मृत्यू

sakal_logo
By

मुरबाड. ता. १ (बातमीदार) : तालुक्यातील शिवेची वाडी येथील एका शेतकऱ्याच्या बैलाचा लम्पी या रोगाने आजारी पडून मृत्यू झाला. तालुक्यातील हा भाग अत्यंत दुर्गम व डोंगराळ आहे, त्यामुळे २० दिवसांपूर्वी झालेल्या या बैलाच्या मृत्यूबाबत पशुसंवर्धन विभागाने कमालीची गुप्तता बाळगली. टोकावडे परिसरातील चासोळे येथील तुकाराम निमसे यांच्या जनावरांना; तर शिवेची वाडी येथील विठ्ठल भला या शेतकऱ्याच्या वासराला या आजाराने ग्रासले असल्याचे समोर आले आहे. तालुक्यात लम्पीचा प्रादुर्भाव आढळल्याने मुरबाडच्या पशुसंवर्धन विभागाने जनावरांच्या लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. सध्या पशुसंवर्धन विभागाच्या सर्वच अधिकारी व कर्मचारी यांना शनिवारी व रविवारी सक्तीने कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून तालुक्यातील सुमारे २०६ गावांमध्ये नव्वद टक्के लसीकरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. समीर तोडणकर यांनी दिली.