८५ लाख रुपयांचे १६ किलो चरस जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

८५ लाख रुपयांचे १६ किलो चरस जप्त
८५ लाख रुपयांचे १६ किलो चरस जप्त

८५ लाख रुपयांचे १६ किलो चरस जप्त

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : मुंबई पोलिसांनी सोमवारी ३१ ऑक्टोबर रोजी रात्री वडाळा परिसरातून ८५ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. याप्रकरणी २८ वर्षीय आरोपी जाहीद टिपू सुलतान खान याला अटक करण्यात आली. आरोपीकडून १६ किलो वजनाचे ८५ लाख रुपयांचे चरस जप्त केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमली पदार्थांच्या तस्करीसंदर्भात गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळताच पोलिसांनी एक पथक तयार करून सोमवारी रात्री घटनास्थळी सापळा रचला. रात्री ११ च्या सुमारास पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला बाईकवर घटनास्थळी येताना पाहिले. त्यास तपासणीसाठी थांबवले. तपासणीदरम्यान आरोपीकडे चरस सापडल्याने त्यास अटक करण्यात आली. सध्या आरोपी पोलिस कोठडीत असून वडाळा पोलिस प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.