स्टरलाईटच्या विजवाहिन्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्टरलाईटच्या विजवाहिन्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान
स्टरलाईटच्या विजवाहिन्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

स्टरलाईटच्या विजवाहिन्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

sakal_logo
By

टिटवाळा, ता. १ (बातमीदार) : कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागातून स्टरलाईट या वीज कंपनीची वीजवाहिनी टाकण्यात येत आहे. या वीजवाहिनीसाठी उभारण्यात येणाऱ्या टॉवरमुळे १५ गावांतील शेकडो हेक्टर जमीन निकामी होणार आहे. जमिनीचा मोबदला अत्यल्प मिळणार असल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. सरकारी काम आहे, असे सांगत स्टरलाईट कंपनीचे कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना न विचारताच त्यांच्या जमिनीतून टॉवरचे काम सुरू केले आहे. ना सरकारी मोजणी, ना मोबदल्याबाबत स्पष्टता, यामुळ शेतकऱ्यांनी वीजवाहिनी व टॉवरला विरोध केला आहे.
तालुक्यातील पोई, चवरे, नवगाव, बापसई, आडिवली, म्हसकळ, फळेगाव, आरेला, दानबाव नडगाव, वावेघर, वाळकस, बेहरे, येथून ही वीजवाहिनी पडघे येथे जाणार आहे. त्यासाठी पाचेशे हेक्टरहून अधिक जमीन बाधित होणार आहे. टॉवर उभारणीमुळे टॉवरखालील शेतजमीन ही विनावापराची होणार आहे. यात शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.

मोबदल्याबाबत दुटप्पी भूमिका
-----------
शेतकऱ्यांना मोबदला देण्याबाबत एकवाक्यता नसल्याने शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत. बाधित शेतकऱ्यांना फसवले जात आहे, असा आरोप अनंत बांगर यांनी केला आहे. त्यांचीही यात शेतजमीन यामुळे निकामी होणार आहे.

शासकीय मोजणी न करताच भूसंपादन
----------------------------
स्टरलाईट ही खासगी कंपनी आहे. या कंपनीने खारघर ते पडघा अशी वीजवाहिनी टाकण्याचे काम घेतले आहे. कंपनीने स्वतःच सर्व्हे केला आहे. हा सर्व्हे खासगी यंत्रणाद्वारे करण्यात आला आहे. सरकारी रीतसर फी भरून सर्व्हे न करता टॉवरचे काम सुरू करणे म्हणजे शेतकऱ्यांवर अन्याय आहे. असे सांगत चवरे येथील शेतकरी विलास ठाकरे यांनी त्यांच्या शेतात चालू असलेले टॉवरचे काम थांबवले आहे.

-----------------
टॉवरचे काम करताना माझ्या शेतकरी बांधवावर अन्याय झाल्यास सहन करणार नाही. कंपनीने रीतसर शासकीय सर्व्हे करून समाधानकारक मोबदला द्यावा.
-किसन कथोरे, आमदार
-----------------------
स्टरलाईट कंपनीचे प्रशासन शेतकऱ्यांची दिशाभूल करून कामे करत आहे.
- गोविंद भोईर, शेतकरी
-------------
स्टरलाईटच्या टॉवरच्या कामात शेतकऱ्यांची फसवणूक करणार नाही, योग्य न्याय देऊ.
- सुरजित सिंग, अधिकारी स्टरलाईट