इंडोनेशियातील डॉक्टरांना ‘टाटा’ची मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंडोनेशियातील डॉक्टरांना ‘टाटा’ची मदत
इंडोनेशियातील डॉक्टरांना ‘टाटा’ची मदत

इंडोनेशियातील डॉक्टरांना ‘टाटा’ची मदत

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : टाटा रुग्णालयात कर्करोग रुग्णांच्या साह्यासाठी ‘पेशंट नेव्हिगेशन’ प्रोग्राम यशस्वी राबवल्यानंतर आता इंडोनेशियातही हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. त्यासाठी नुकतेच टाटा मेमोरियल सेंटरने इंडोनेशियातील कर्करोग रुग्णांच्या काळजीसाठी आणि त्यांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी इंडोनेशियाच्‍या आरोग्‍य विभागाशी कॅन्सर ‘पेशंट नेव्हिगेशन’ प्रोग्रामच्या भागीदारी करारावर स्वाक्षरी केली आहे.
‘पेशंट नेव्हिगेशन’ प्रकल्पात रुग्ण, कुटुंबे आणि काळजीवाहू यांना आरोग्य सेवा प्रणालीतील अडथळे दूर करण्यात मदत करण्यासाठी वैयक्तिक मदत करण्यात येते. या विषयी टाटा रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी सांगितले, कर्करोग सेवेची सहज उपलब्धता आणि दर्जा असूनही उपचारांच्या प्रक्रियेत समस्या निर्माण होतात. हे अडथळे दूर होण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरत आहे. उपचारातील सकारात्मक परिणामांसाठी रुग्णाच्या आर्थिक, भावनिक, मानसिक, सामाजिक आणि सांस्कृतिक गरजा पूर्ण करणे महत्त्‍वाचे आहे आणि ही भूमिका प्रकल्पाद्वारे निभावली जाते. परिणामी, यामुळे कर्करोग रुग्णांचे आयुष्य अधिक सुकर होत असल्याचेही दिसून आले आहे.

असा आहे ‘पेशंट नेव्हिगेशन’ प्रोग्राम
टाटा रुग्णालयात ऑन्कोलॉजीमधील नेव्हिगेशनमध्ये एक वर्षाचा पोस्ट-ग्रॅज्युएट डिप्लोमा प्रोग्राम, जो काळजीच्या मनो-सामाजिक पैलूंमध्ये शिक्षण प्रदान करतो, तर टाटा रुग्णालयात क्लिनिकल पैलूंमध्ये प्रशिक्षण देते. हाच कार्यक्रम आता इंडोनेशियाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वेगळ्या शिक्षण मॉडेलद्वारे राबविण्यात येणार आहे. ज्यात ऑनलाईन ट्युटोरियलमधील व्यावहारिक प्रशिक्षण, त्यानंतर तज्ज्ञांच्या देखरेखीखाली सहभागी रुग्णालयांमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे.

कोरोना काळात ठरले उपयुक्‍त
इंडोनेशियन विद्यार्थ्यांच्‍या पहिल्या तुकडीला टाटा रुग्णालयाच्या भागीदाराने प्रशिक्षण दिले गेले आहे. हे विद्यार्थी इंडोनेशियात कर्करोग रुग्ण नेव्हिगेटर म्हणून काम करतील. टीएमसीनेच केवटच्या साह्याने आतापर्यंत दोन बॅच तयार केल्या आहेत आणि तिसरी बॅच लवकरच सामील होणार आहे. त्यांनी गेल्या तीन वर्षांत ४ लाखांहून अधिक रुग्णांना मदत केली आहे, जी विशेषतः कोरोना काळात उपयुक्त ठरली.