मराठी फलकासाठी कारवाईचा बडगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मराठी फलकासाठी कारवाईचा बडगा
मराठी फलकासाठी कारवाईचा बडगा

मराठी फलकासाठी कारवाईचा बडगा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : दुकानांवर मराठी फलक लावणे बंधनकारक असतानाही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील १५३ दुकानदारांवर कामगार उपायुक्त कार्यालयामार्फत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी १५ जणांना साडेतीन लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. यापैकी एका आस्थापना मालकावर दोन लाख ८६ हजार रुपयांचा दंड आकारण्याची कारवाई करण्यात आली.
शासनाने प्रत्येक दुकाने व व्यापारी आस्थापनांचे नामफलक मराठीत प्रदर्शित करण्याचे बंधनकारक केले आहे. त्यानुसार कामगार उपायुक्त कार्यालयाने जिल्ह्यात तपासणी मोहीम हाती घेत ४५७ दुकाने व व्यापारी आस्थापनांना निरीक्षण भेटी दिल्या. त्यातील ३०४ दुकानांची नावे मराठीत असल्याचे आढळून आले; तर ज्या १५३ दुकानदारांनी मराठी फलक लावले नाहीत, अशांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले. अधिनियमातील तरतुदीनुसार १५ आस्थापना मालकांनी कामगार उपायुक्त तथा प्रशमन अधिकाऱ्यांकडे गुन्हा मान्य केल्याने आढळून आलेल्या त्रुटींच्या पूर्ततेसह त्यांना तीन लाख ४९ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती कामगार उपायुक्त सं. सं. भोसले यांनी दिली आहे.