पुरंजय खन्ना यांचे ‘सेकंड स्टार’ प्रकाशित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुरंजय खन्ना यांचे ‘सेकंड स्टार’ प्रकाशित
पुरंजय खन्ना यांचे ‘सेकंड स्टार’ प्रकाशित

पुरंजय खन्ना यांचे ‘सेकंड स्टार’ प्रकाशित

sakal_logo
By

घाटकोपर, ता. २ (बातमीदार) ः तरुण कवी पुरंजय खन्ना यांच्या ‘सेकंड स्टार’ या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या रिपब्लिक ऑफ एस्टोनियाच्या भारतातील राजदूत कॅटरिन किवी आणि महाराष्ट्र मुख्य माहिती आयुक्त सुमित मलिक होते. या वेळी कलाकार डेन्झिल स्मिथ आणि कॅप्टन ऑलविन सलधाना आदी मान्‍यवर या सोहळ्यासाठी उपस्थित होते. डेन्झिल स्मिथने या पुस्तकातील काही कविता आपल्या प्रभावी आवाजात वाचल्या. यासोबतच स्वत: पुरंजय खन्ना यांनीही आपल्या खास शैलीत आपल्या रचलेल्या कवितांचे वाचन केले. यावेळी पुरंजय खन्ना यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.