संजीव पिंपळे यांना सहाय्यक पोलिस आयुक्‍तपदी बढती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संजीव पिंपळे यांना सहाय्यक पोलिस आयुक्‍तपदी बढती
संजीव पिंपळे यांना सहाय्यक पोलिस आयुक्‍तपदी बढती

संजीव पिंपळे यांना सहाय्यक पोलिस आयुक्‍तपदी बढती

sakal_logo
By

जोगेश्वरी, ता. २ (बातमीदार) ः पोलिसांच्‍या परिमंडळ दहा अंतर्गत येणाऱ्या जोगेश्‍वरी पूर्वच्‍या मेघवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजीव पिंपळे यांना पालघर येथे सहाय्यक पोलिस आयुक्‍त (एसीपी) पदी बढती मिळाली आहे. जेागेश्‍वरीच्‍या मेघवाडी पोलिस ठाण्यामध्‍ये धडाडीचे पोलिस अधिकारी म्हणून संजीव पिंपळे यांना ओळखले जाते. पोलिस उपायुक्‍त डॉ. महेश्‍वर रेड्डी यांच्‍या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक असताना त्‍यांनी केलेल्‍या अनेक गुन्ह्यांची उकल व पूर्ण जोगेश्‍वरी विभागात गुन्‍हेगारीविरोधी बसवलेली आपली जरब तसेच पोलिस खात्‍यातील उत्‍तम कामगिरी म्‍हणून त्‍यांची एसीपीपदी वर्णी लागल्‍याचे बोलले जाते. मेघवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्‍या कार्यकर्त्यांकडून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन सन्‍मान करण्‍यात आला.