बेघर मुलांचा सर्व्हे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेघर मुलांचा सर्व्हे
बेघर मुलांचा सर्व्हे

बेघर मुलांचा सर्व्हे

sakal_logo
By

मुंबादेवी, ता. २ (बातमीदार) ः महाराष्ट्र राज्य शासन आदिवासी प्रकल्प बोरिवली यांच्या अंतर्गत आदिवासी प्रकल्पाचे अधिकारी वाल्मिकी पाटील, तसेच आदिवासी पारधी महासंघाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष संतोष पवार यांनी मुंबईतील विविध भागातील आदिवासी पाड्यावर व पदपथांवरील बेघर आदिवासी, पारधी समाजातील मुलांचा सर्व्हे सुरू केला आहे. या मुलांची नोंदणी करून अर्ज भरण्यात येत असल्याचे संतोष पवार यानी सांगितले. हे अर्ज भरताना नाव, वय, पत्ता, लिंग, धर्म, जात यांची नोंद करण्यात येत असून आदिवासी, पारधी कुटुंबीय आणि मुलांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आर्थिक उत्कर्षासाठी हे फार महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे.