दुचाकीसह आरोपींना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुचाकीसह आरोपींना अटक
दुचाकीसह आरोपींना अटक

दुचाकीसह आरोपींना अटक

sakal_logo
By

धारावी, ता. २ (बातमीदार) : धारावीतील शाहूनगर पोलिस ठाणे हद्दीतील रेल्वे कॉलनी येथून दुचाकी चोरीला गेली होती. या दुचाकीसह दोन आरोपींना पोलिसांनी मध्यरात्री अटक करून मुद्देमाल हस्तगत केला.
धारावीतील कुट्टीवाडी येथील रहिवासी समीर शेख यांनी रेल्वे कॉलनी येथे आपली दुचाकी २१ ऑक्टोबर रोजी उभी करून ठेवली होती. रात्री साडे अकराच्या दरम्यान ही दुचाकी चोरीला गेल्‍याचे आढळून आले. त्‍यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गोपनीय बातमीदारामार्फत पोलिसांना माहिती प्राप्त झाली की, चोरीला गेलेली दुचाकी घेऊन दोन व्‍यक्‍ती पश्चिम रेल्वे वसाहत गेटजवळ उभे आहेत. त्‍यावर पोलिसांनी तत्काळ तेथे जाऊन पाहणी केली असता चोरी झालेल्या दुचाकीसह दोन व्‍यक्‍ती तेथे हजर होत्या. पोलिसांनी दुचाकी व दोन्ही व्‍यक्‍तींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले. त्यांना गुन्ह्यात अटक करण्यात आली. या आरोपींची नावे सिधेश बांद्रे व नीलेश पवार अशी आहेत. शाहू नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक ठुबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी व पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण, हवालदार भोसले, शिपाई माळी, कोल्हे, गायकवाड यांनी ही कारवाई केली.