टोकावडे येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टोकावडे येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर
टोकावडे येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर

टोकावडे येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर

sakal_logo
By

मुरबाड, ता. २ (बातमीदार) : तालुक्यातील टोकावडे येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरास परिसरातील लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल व सोनाई शैक्षणिक व सामाजिक संस्था, टोकावडे यांच्यातर्फे हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.
टोकावडे परिसरातील उमरोली, बळेगाव, खापरी, तळवली, करचोंडे, एकलहरे, टोकावडे, चासोळे, झाडघर, फांगणे, इंदे, जडई, शेलगाव या परिसरातील सुमारे २०० रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. यामधून ३१ रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी पनवेल येथे पाठविण्यात आले. या शिबिराचे उद्‌घाटन टोकावडे पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक संसारे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रकाश पाटील, सामाजिक कार्यकर्ते चिंतामण घोलप, ठाणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय पवार, ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे टोकावडे शाखेचे व्यवस्थापक कैलास कोर आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिराचे आयोजन सोनाई शैक्षणिक व सामाजिक संस्था टोकावडेचे अध्यक्ष व कुणबी समाज संघटना मुरबाडचे सरचिटणीस प्रकाश पवार यांनी केले होते. शिबिराला पंचायत समिती मुरबाडचे माजी सदस्य अनिल घरत यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. शिबिर यशस्वी करण्यासाठी ठाणे-पालघर आरोग्य विभाग पतपेढी संचालक प्रमोद घोलप, चेअरमन किशोर राऊत, सुहास पवार, आशीष पवार, निकलेश पवार, संतोष मोरे, महेश पवार, यांनी पवार, विनोद कोर, शकील शेख, किरण पवार (करचोंडे) दीपक मुंडे, कैलास निमसे, विलास राऊत, प्रभाकर सूर्यराव, यशवंत गायकर यांनी विशेष मेहनत घेतली.