भाजीच्या टेम्पोतून गुटख्याची तस्करी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजीच्या टेम्पोतून गुटख्याची तस्करी
भाजीच्या टेम्पोतून गुटख्याची तस्करी

भाजीच्या टेम्पोतून गुटख्याची तस्करी

sakal_logo
By

नवी मुंबई (वार्ताहर) : भाजीचा टेम्पो असल्याचे भासवून भिवंडी येथून पनवेल येथे घेऊन जाणाऱ्या गुटख्याचा साठा नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने सापळा लावून पकडला आहे. या कारवाईत टेम्पोचालकासह १० लाख १५ हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे.
नवी मुंबई परिसरात गुटख्याचा साठा वितरित करण्यासाठी प्रतिबंधित गुटख्याने भरलेला टेम्पो भिवंडी येथून मुंब्रा-पनवेल मार्गावरून पनवेल येथे नेला जाणार असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पनवेल पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी पहाटे मुंब्रा-पनवेल मार्गावरील धानसर टोल नाका येथे सापळा लावला होता. या वेळी ५.३०च्या सुमारास धानसर टोलनाक्यावर आलेल्या टेम्पोची अमली पदार्थविरोधी पथकाने तपासणी केली असता त्यात भाजीच्या कॅरेटमध्ये ठेवलेला १० लाख १५ हजार रुपये किमतीचा गुटखा आढळून आला. याप्रकरणी अमली पदार्थविरोधी पथकाने टेम्पोचालक मोहम्मद नदीम शौकतअली खान (३२) याच्याविरोधात तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.