बांधकामाचे साहित्य चोरणाऱ्यांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांधकामाचे साहित्य चोरणाऱ्यांना अटक
बांधकामाचे साहित्य चोरणाऱ्यांना अटक

बांधकामाचे साहित्य चोरणाऱ्यांना अटक

sakal_logo
By

डोंबिवली, ता. २ (बातमीदार) : डोंबिवली येथील रुणवाल माय सिटीमधील स्टोअर रूचा दरवाजा तोडून ७ लाख रुपये किमतीचे बांधकाम साहित्य चोरून नेल्याची घटना घडली आहे. हे साहित्य चोरणाऱ्या दोघांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. अकबर कलाम उद्दीन खान आणि इजहार अहमद खान अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिस हवालदार राजेंद्र खिल्लारे तपास करत आहेत. सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश वनवे यांच्या पथकाने सीसी टीव्हीच्या साह्याने चोरट्यांना अटक केली.