सांस्कृतिक मंत्र्यांकडून आदीवासी महिलांच्या कामाचे कौतुक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सांस्कृतिक मंत्र्यांकडून आदीवासी महिलांच्या कामाचे कौतुक
सांस्कृतिक मंत्र्यांकडून आदीवासी महिलांच्या कामाचे कौतुक

सांस्कृतिक मंत्र्यांकडून आदीवासी महिलांच्या कामाचे कौतुक

sakal_logo
By

विरार, ता. २ (बातमीदार) : सेवा विवेक सामाजिक संस्थेच्या पालघर जिल्ह्यातील आदिवासी महिलांतर्फे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि पर्यटन, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांना बांबूपासून हस्तकलेद्वारे बनवलेल्या वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या. याप्रसंगी त्यांनी सेवा विवेकच्या कार्याचे कौतुक केले व आदिवासी महिलांची भेट स्वीकारून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या वेळी हिंदुस्थान प्रकाशनचे अध्यक्ष रमेश पतंगे, विवेक साप्ताहिकाचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर, सेवा विवेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी लुकेश बंड, राजकुमारी गुप्ता, प्रशिक्षण व विकास अधिकारी प्रगती भोईर, बांबू कारागिर महिला नम्रता सांबरे व रजनी सांबरे उपस्थित होत्या.
साप्ताहिक विवेक आयोजित विनित तेलंग यांनी लिहलेल्या, लता मंगेशकर यांच्या नवरसांवरील गाण्यांच्या रसास्वादच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रवींद्र नाट्यमंदिर येथे पार पडला. या पुस्तकाचे प्रकाशन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, ज्येष्ठ गायक आणि संगीतकार श्रीधर फडके यांच्या हस्ते झाले.
सेवा विवेक सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून महिला सक्षमीकरणासाठी पालघर जिल्ह्यातील आदिवासी गरजू महिलांसाठी काम करत आहे. घरकाम सांभाळून त्यांना आर्थिक हातभार लाभावा, त्यांना सन्मानजनक रोजगार प्राप्त व्हावा, या हेतूने सेवा विवेकने पुढाकार घेतला आहे.

...................
उत्पादनाच्या दर्जेदारपणामुळे चांगली मागणी
या वर्षी महिलांनी बनवलेल्या राखी व कंदिलांना विदेशातही मागणी होती. तसेच वर्षभर महिला इतर वस्तू मोठ्या प्रमाणात तयार करतात. यामध्ये बांबूपासून विविध प्रकारचे पेन होल्डर, मोबाईल होल्डर, पात्राधर, फिंगर जॉईंट ट्रे यांसारख्या ३६ बांबू हस्तकलेच्या आकर्षक वस्तू तयार करतात. या मागणीचा थेट परिणाम पालघर जिल्हातील आदिवासी महिलांचा रोजगार निर्मितीवर होत असून त्यांना प्रशिक्षणानंतर घरच्या घरी रोजची कामे सांभाळून फावल्या वेळेत बांबू काम करून रोजगाराची मोठी संधी मिळाली आहे.