भाडेवाढ रद्द करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाडेवाढ रद्द करण्याची मागणी
भाडेवाढ रद्द करण्याची मागणी

भाडेवाढ रद्द करण्याची मागणी

sakal_logo
By

धारावी, ता. २ (बातमीदार) : मुंबई महापालिकेने भाडेकरूंच्या भाड्यात तीन रुपये प्रति चौरस फूट अशी भाडेवाढ केली. मुंबई भाडेकरू परिषदेने याला विरोध केला होता. दरम्‍यान, महापालिकेने या भाडेवाढीला स्थगिती दिली आहे. मात्र स्थगिती नको, भाडेवाढच रद्द करा, अशी मागणी मुंबई भाडेकरू परिषदेने केली आहे. स्थगिती हा निर्णय केवळ येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका समोर ठेऊन घेतलेला आहे. निवडणुका झाल्यानंतर या भाडेवाढीची टांगती तलवार भाडेकरूंवर राहणार असल्‍याचे बोलले जात आहे.
मुंबई महापालिकेतला भ्रष्टाचार रोखला तर कोटी नव्हे दशलक्ष कोटी रुपये नगरविकासासाठी उपलब्ध होतील. पैशांसाठी महापालिकेच्या जागेत राहणाऱ्या गरीब, मध्यमवर्गीय, कष्टकरी भाडेकरूंवर भाडेवाढ लादण्याची काहीही जरूरी नसल्याचे परिषदेचे अध्यक्ष कॉम्रेड प्रकाश नार्वेकर व जनरल सेक्रेटरी कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांनी सांगितले.

--