एटीएम कार्डची अदलाबदल करून फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एटीएम कार्डची अदलाबदल करून फसवणूक
एटीएम कार्डची अदलाबदल करून फसवणूक

एटीएम कार्डची अदलाबदल करून फसवणूक

sakal_logo
By

मानखुर्द, ता. २ (बातमीदार) ः एटीएम कार्डची अदलाबदल करून फसवणूक करणाऱ्या साहिल शेख या सराईत गुन्हेगाराला साकीनाका पोलिसांनी सोमवारी (ता. ३१) अटक केली. त्याच्याकडून विविध बँकांची एकूण ४४ एटीएम कार्ड पोलिसांनी जप्त केली आहेत. एका महिलेच्या तक्रारीवरून नोंद केलेल्या गुन्ह्याचा तपास करताना ही धक्कादायक बाब समोर आली होती.
कुर्ल्याच्या जरीमरी साकीनाका परिसरातील एटीएममधून पैसे काढण्यासाठी एक महिला शुक्रवारी (ता. २८) गेली होती. तेव्हा तिला पैसे काढण्यास मदत करतो अशी बतावणी करत साहिलने चलाखीने तिच्याकडील कार्ड घेऊन स्वतःकडील भलतेच कार्ड तिला दिले. महिलेच्या कार्डचा वापर करत त्याने एटीएममधून रोख रक्कम, तसेच दागिन्यांची खरेदी केली. त्यानंतर महिलेने साकीनाका पोलिस ठाणे गाठत त्याच्याविरोधात तक्रार नोंदवली. साकीनाका पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी अर्जुन कुदळे व त्यांच्या पथकाने त्या एटीएम परिसरातील तसेच दागिन्यांची खरेदी केलेल्या दुकानातील सीसी टीव्हीची तपासणी करून खबऱ्यांमार्फत साहिलची माहिती काढली. त्या माहितीच्या आधारे अखेर त्याला विद्याविहार येथून अटक करण्यात यश आले.