जिजाऊ संस्थेतर्फे कृतज्ञतेची भाऊबीज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिजाऊ संस्थेतर्फे कृतज्ञतेची भाऊबीज
जिजाऊ संस्थेतर्फे कृतज्ञतेची भाऊबीज

जिजाऊ संस्थेतर्फे कृतज्ञतेची भाऊबीज

sakal_logo
By

विक्रमगड, ता. २ (बातमीदार) : जिजाऊ शैक्षणिक व समाजिक संस्था आयोजित कृतज्ञतेची भाऊबीज कार्यक्रम मंगळवारी (ता. १) पार पडला. कोरोनाकाळात आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र रुग्णाची सेवा करणाऱ्या आशा, नर्स, डॉक्टर यांना पैठणी व राजमाता जिजाऊ यांची चांदीची प्रतिमा भाऊबीज म्हणून भेट देऊन गौरव करण्यात आला.
विक्रमगड तालुक्यातील कुर्झे आणि मलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलिस ठाणे विक्रमगड व ग्रामीण रुग्णालय विक्रमगड येथे आयोजित कृतज्ञता भाऊबीज सोहळा ४०० भगिनींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात काल पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था कार्याध्यक्ष सानिका ढोणे, जिजाऊ एमपीएससी, यूपीएससी अकॅडमी व वाचनालयप्रमुख गणेश सांबरे, विक्रमगड नगरपंचायत येथील उपनगराध्यक्ष महेंद्र पाटील उपस्थित होते. याप्रसंगी विक्रमगड नगरपंचायत नगरसेवक निकेत पडवळे, अमोल भडांगे, मनोज वाघ, नगरसेविका अर्चना लोहार, वैशाली तामोरे व इतर नगरसेविका, संस्थेचे पदाधिकारी सुजित भानुशाली, नरेश वाघचौरे, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, स्वयंसेवक आणि स्वयंसेविका तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.