सरकारी जमिनीवर पुन्हा अतिक्रमण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरकारी जमिनीवर पुन्हा अतिक्रमण
सरकारी जमिनीवर पुन्हा अतिक्रमण

सरकारी जमिनीवर पुन्हा अतिक्रमण

sakal_logo
By

मानखुर्द, ता. २ (बातमीदार) ः मानखुर्दच्या मंडाळा झोपडपट्टीतील अतिक्रमणे जिल्हाधिकाऱ्यांकडून सोमवारी (ता. ३१) हटवण्यात आली होती; मात्र रात्रभरात झोपडीमाफियांनी त्या ठिकाणी अतिक्रमण करण्यास सुरुवात केली व सकाळपर्यंत झोपड्या पुन्हा उभ्या राहिल्या. मागील अनेक वर्षांपासून हेच चक्र सुरू असून ठोस कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. वारंवार त्या ठिकाणी कारवाई करण्यात सरकारी यंत्रणांचा वेळ व जनतेचा पैसा खर्च होत आहे; मात्र झोपडीमाफियांवर अंकुश ठेवण्यात यश येत नसल्‍याने नागरिक नाराज आहेत.
मंडाळा झोपडपट्टीच्या मातंग ऋषी नगरातील शिवनेरी विद्यालयासमोर जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखालील भूखंड आहे. या भूखंडावर वारंवार अतिक्रमण करण्याचा प्रयत्न होतो. जिल्हाधिकाऱ्यांचे पथक मानखुर्द पोलिसांच्या संरक्षणात ती अतिक्रमणे हटवतात. वापराविना पडून असलेला या भूखंडाचा वापर समाजोपयोगी कार्यासाठी सरकार का करत नाही किंवा त्यावर सूचनेचा फलक लावून संरक्षक भिंत बांधून संरक्षित का करत नाही, असा प्रश्न स्थानिक उपस्थित करत आहेत.

जिल्‍हा प्रशासनाने केली होती कारवाई
सोमवारी येथील अतिक्रमणांवर जिल्‍हा प्रशासनाने पोलिस बंदोबस्‍तात कारवाई करत सर्व झोपड्या पाडल्‍या होत्‍या. मात्र रात्रभरात येथे पुन्‍हा अतिक्रमण झाले आहे. दरम्‍यान पोलिस संरक्षण उपलब्ध झाल्यास त्या ठिकाणी पुन्हा कारवाई करण्यात येईल, तसेच कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून संरक्षक भिंत बांधण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली आहे.