भिवंडीत वऱ्हाळादेवीच्या महापूजेनिमित्त यक्षगान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडीत वऱ्हाळादेवीच्या महापूजेनिमित्त यक्षगान
भिवंडीत वऱ्हाळादेवीच्या महापूजेनिमित्त यक्षगान

भिवंडीत वऱ्हाळादेवीच्या महापूजेनिमित्त यक्षगान

sakal_logo
By

भिवंडी, ता. २ (बातमीदार) : श्री नित्यानंद चॅरिटेबल ट्रस्ट हा भिवंडीत स्थायिक झालेल्या दक्षिण भारतातील रहिवाशांचा ट्रस्ट आहे. गावदेवीच्या श्रद्धेपोटी गेल्या ६० वर्षांपासून हा ट्रस्ट गावदेवी वऱ्हाळादेवीची महापूजा बांधून विविध कार्यक्रम आयोजित करीत आहे. दर वर्षीनुसार या वर्षीदेखील मंगळवारी सायंकाळी यक्षगान कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
भिवंडीत गावदेवी वऱ्हाळादेवीचे महत्त्‍व असल्याने शहरातील विविध राज्यांतील भाविक आपापल्या प्रथा-परंपरेनुसार देवीची पूजा बांधून भक्ती करतात. त्यानुसार दक्षिण भारतातील कर्नाटकी, मद्रास, केरळ येथील देवीचे भाविक श्री नित्यानंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून चैत्र नवरात्रीस ही महापूजा बांधत होते; परंतु गेली दोन वर्षे कोरोनाच्या निर्बंधामुळे ही महापूजा सोयीनुसार होऊ लागली आहे. गेल्या साठ वर्षांपासून महापूजेनिमिताने दरवर्षी देवीच्या मूर्तीच्या मूळ मंदिरात आकर्षक विविध फुलांची आरास केली जाते. त्यांच्या प्रथेप्रमाणे सकाळपासून मंत्रांच्या जयघोषात व होमहवन करून महागणपती याग, नवकलश प्रतिष्ठापना करण्‍यात आली. तसेच पूर्णाहुती देऊन पूजा झाली. त्यानंतर भजन करून ताल सेवा केली. दुपारी सर्व भाविकांनी कुटुंबासह येऊन देवीची आरती केली. त्यानंतर अन्नसमर्पणाचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी फुलांची सजावट जॉली टेलरचे मालक हरीश शेट्टी यांनी केली. तसेच त्यांनी मंदिराच्या आवारात भक्तांसाठी कायमस्वरूपी पत्र्याची शेड बनविली.
यक्षगानद्वारा नाट्य सादर
मंदिराजवळ असलेल्या अयाप्पा मंदिराच्या पटांगणात गुरुनारायण यक्षगान मंडळाने बाप्पानाडू क्षेत्र माहात्म्य हे नाट्य यक्षगानद्वारा सादर केले. या कार्यक्रमास भाविक कुटुंबाने गर्दी करून यक्षगान कार्यक्रमाचा आनंद घेतला. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ट्रस्टचे अध्यक्ष वासू. एस. सुवर्णा, उपाध्यक्ष रामकृष्ण शेट्टी, संजीव पुजारी, प्रशांत पुजारी, सुमित शेट्टी, प्रकाश शेट्टी यांच्या सह कार्यकारी सदस्यांनी मेहनत घेतली.