जीपीएस यंत्रणेमुळे भूमापनास गती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जीपीएस यंत्रणेमुळे भूमापनास गती
जीपीएस यंत्रणेमुळे भूमापनास गती

जीपीएस यंत्रणेमुळे भूमापनास गती

sakal_logo
By

प्रसाद जोशी : सकाळ वृत्तसेवा
वसई, ता. २ : जमीन मोजणीसाठी होणारा विलंब, विविध अडचणींचे सावट आता दूर होणार आहे. यासाठी जिल्ह्यात थेट ईटीएस स्टेशनचा वापर करण्यात येणार आहे. यात जीपीएस यंत्रणेचा वापर करण्यात येणार असल्याने भूमापन अचूक आणि सहापट जलदगतीने होणार आहे. यामुळे पालघर जिल्ह्यातील जमिनी मोजमापाला गती मिळणार आहे.
पारंपरिक पद्धतीने जमिनीचे मोजमाप करताना पूर्ण दिवस किंवा अधिक कालावधी लागतो. त्यातच अनेक अडचणी येत असतात, त्यामुळे पुढील कार्यवाही करण्यास उशीर होत असतो. जीपीएसचा वापर केल्याने अल्प कालावधीत जमीन मोजणी प्रक्रिया करून भूमापन करण्यासाठी रोव्हर पद्धत वापरली जाऊ शकते. त्यासाठी निरंतर संचलन केंद्र प्रत्येक तालुक्यातील भूमिअभिलेख कार्यालय आहे, पण मनुष्यबळाची कमतरता असल्याने अनेकदा जमिनीची मोजणी लांबणीवर पडते, तर जमीन मालकांना मोजणीसाठी कार्यालयात खेपा माराव्या लागतात. मात्र आधुनिक पद्धतीमुळे जिल्ह्यातील भूमापन करणे सहज शक्य होणार आहे. तसेच मोजणी करताना अचूक क्षेत्रफळ निश्चित करता येणार आहे. यामुळे निरीक्षण, नोंदी व नकाशे शक्य होणार आहे. यामुळे मोजणी काम सुरू केल्यावर पाच ते सहापट जलद गतीने काम पूर्ण होणार आहे. या यंत्रणेच्या वापरामुळे प्रलंबित कामे मार्गी लागणार आहेत.
वसई व डहाणू तालुक्यात निरंतर संचलन केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. वसई येथील मालोंडे तर डहाणूत कासा याठिकाणी ही केंद्र कार्यान्वित करण्यात येणार आहेत. त्यामुळे अत्याधुनिक यंत्रणा व त्याचा फायदा हा जमीन मालकांना होणार आहे.
...
यंत्रणा फायदेशीर
अनेकदा भूमी अभिलेख कार्यालयात मोजणीसाठी वेळ लागत असल्याने खाजगी भू-मापक जमीन मोजतात. त्यांना अधिक पैसे मोजावे लागतात. मात्र जीपीएस यंत्रणेमुळे नागरिक हे भूमिअभिलेख कार्यालयातील भू-मापकांकडूनच जमिनीचे मोजमाप करू शकतात. त्यामुळे ही यंत्रणा फायदेशीर ठरणार आहे.
--
यंत्रणेचे फायदे
मनुष्यबळाचा ताण कमी होणार
जीपीएसच्या रोव्हर मशीन पद्धतीमुळे काम अचूक
दर्जा उंचावेल, काम जलद
मोजणीच्या कामात पारदर्शकता
जमिनीचे अक्षांश, रेखांश जमीन मालकांना उपलब्ध
पारंपरिकपेक्षा सहापट अधिक गतीने मोजणीचे काम
-----------------------
जीपीएस आधारित रोव्हर पद्धतीमुळे जमिनीची मोजणी करणे सहज शक्य होणार आहे. यासाठी केंद्र उभारली जाणार आहेत. मनुष्यबळ कमतरतेवर मात करण्यासाठी हा पर्याय उत्तम आहे.
- महेश इंगळे, जिल्हा अधीक्षक, भूमिअभिलेख, पालघर