पालिकेने होर्डिंग व बॅनर हटवावेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालिकेने होर्डिंग व बॅनर हटवावेत
पालिकेने होर्डिंग व बॅनर हटवावेत

पालिकेने होर्डिंग व बॅनर हटवावेत

sakal_logo
By

बदलापूर, ता. २ (बातमीदार) : स्वच्छ सुंदर असं बिरूद मिरवणाऱ्या बदलापूर शहराला अनधिकृत होर्डिंग आणि बॅनरचा विळखा पडला आहे. अगदी गल्लोगल्लीत, मुख्य रस्त्यांवर, दुभाजकांवर सगळीकडेच राजकीय पोस्टर, बॅनर व व्यावसायिक होर्डिंग पाहायला मिळत असल्याने, शहराचे विद्रुपीकरण होत असल्याचे दिसून येत आहे. यावर कुळगाव-बदलापूर नगरपालिका दुर्लक्ष करत असल्याचे स्‍पष्‍ट करत लवकरात लवकर शहरातील हे अनधिकृत होर्डिंग व बॅनर हटवण्याची मागणी माजी नगरसेवक तुकाराम म्हात्रे यांनी पालिकेकडे केली आहे.

शहरात प्रवेश करताच गल्लीत, मुख्य रस्त्यांवर, रस्त्याच्या मध्ये आणि दोन्ही बाजूंचे खांब, झाडे फक्त बॅनर आणि होर्डिंग्जनी झाकून गेले आहेत. पालिकेचा महसूल बुडवून अनेक राजकीय पुढारी किंवा व्यावसायिक हे होर्डिंग आणि बॅनर लावत आहेत. त्यामुळे पालिकेने याकडे दुर्लक्ष न करता, वेळीच या अनधिकृत होर्डिंग व बॅनर लावणाऱ्यांवर कारवाई करून शहराला बॅनरमुक्त केले पाहिजे, अशी मागणी म्हात्रे यांनी पालिकेकडे केली आहे.
शहरातील मुख्य रस्त्यावर, दुभाजकांवर असलेल्या महावितरणाच्या खांबांवर दोन्ही बाजूंनी लावलेले बॅनर यामुळे, अपघात होण्याची भीती देखील म्हात्रे यांनी व्यक्त करत, या अपघातांची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल देखील उपस्थित केला आहे.