वाकडूपाड्यात मत्स्य खाद्य प्रात्यक्षिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाकडूपाड्यात मत्स्य खाद्य प्रात्यक्षिक
वाकडूपाड्यात मत्स्य खाद्य प्रात्यक्षिक

वाकडूपाड्यात मत्स्य खाद्य प्रात्यक्षिक

sakal_logo
By

विक्रमगड, ता. २ (बातमीदार) : टीएसपी कार्यक्रमांतर्गत पालघर जिल्ह्यातील आदिवासी मत्स्य उत्पादक शेतकऱ्यांच्या तलावावर सेन्ट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन या संस्थेने विकसित केलेले मोबाईल फीड मिल तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षित विक्रमगड तालुक्यातील मत्स्य उत्पादक शेतकऱ्यांसाठी वाकडूपाडा येथे दाखवण्यात आले. या वेळी मोबाईल फीड मिल तंत्रज्ञानाद्वारे पॅलेट फीड तयार करण्याचे प्रात्यक्षिक डॉ. सिकेंद्र कुमार यांनी या वेळी शेतकऱ्यांना दिले. पालघर मत्स्यव्यवसाय विभागाच्या सहकार्याने विक्रमगड येथे हा कार्यक्रम पार पडला. या वेळी सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी अमोल सोनोने यांनी मत्स्यव्यवसाय विभागातील विविध योजनेची माहिती, किसान क्रेडिट कार्ड तसेच मत्स्य शेतीसाठी शासनाची मिळणारे अनुदान याचे मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण कार्यक्रमात पालघर जिल्ह्यातील ५० आदिवासी शेतकरी सहभागी झाले होते. वाकडूपाडा येथील मत्स्यसंवर्धक संतोष गावित आणि संतोष चौधरी यांच्या मदतीने प्रात्यक्षिक कार्यक्रम घेण्यात आला.