सफाळेतील तिकीटघराची वेळ वाढवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सफाळेतील तिकीटघराची वेळ वाढवा
सफाळेतील तिकीटघराची वेळ वाढवा

सफाळेतील तिकीटघराची वेळ वाढवा

sakal_logo
By

वसई, ता. २ (बातमीदार) : सफाळे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेस असलेल्या तिकीट खिडकीची वेळ वाढवून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी रेल्वेचे मुख्य व्यावसायिक व्यवस्थापक निरीक्षक अमित गायकवाड यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन रेल्वेकडून देण्यात आले. या वेळी सफाळे स्टेशन कमिटीचे अध्यक्ष जतिन कदम, सदस्य प्रशांत किणी, सचिन वर्तक, चेतन वैद्य, अंबुलाल जैन, स्टेशन मास्टर चुनीलाल अगलेसर उपस्थित होते. यावेळी सफाळे रेल्वे स्थानकातील विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.