त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त खाद्यतेल जमा करण्याचा निर्धार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त खाद्यतेल जमा करण्याचा निर्धार
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त खाद्यतेल जमा करण्याचा निर्धार

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त खाद्यतेल जमा करण्याचा निर्धार

sakal_logo
By

डोंबिवली, ता. २ : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री गणेश मंदिर संस्थान, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट, इनरव्हिल क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट या संस्थांच्या माध्यमातून हा उपक्रम ५ व ६ नोव्हेंबरला राबवण्यात येणार आहे. या वेळी एक हजार लिटर खाद्यतेल जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे संकलित खाद्यतेल वृद्धाश्रम, निवासी शाळकरी संकुल यांना देण्यात येणार आहे. श्री गणेश मंदिर संस्थानच्या गणेश मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सवचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी सहा ते सात या वेळेत हा दीपोत्सव होणार आहे. यानिमित्त दोन दिवस खाद्यतेल संकलन केले जाणार आहे. इच्छुक नागरिकांनी खाद्यतेल शनिवार (ता. ५), रविवार (ता. ६) या दिवशी गणेश मंदिरात आणून द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. जमा झालेले खाद्यतेल वृद्धाश्रम, शैक्षणिक संस्था यांना वाटप करण्यात येणार आहे.