अंबरनाथमध्ये धावत्या टेम्पोला आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबरनाथमध्ये धावत्या टेम्पोला आग
अंबरनाथमध्ये धावत्या टेम्पोला आग

अंबरनाथमध्ये धावत्या टेम्पोला आग

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. २ (बातमीदार) ः अंबरनाथमध्ये एका धावत्या टेम्पोने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. कल्याण - कर्जत राज्य महामार्गावर मंगळवारी (ता. १) मध्यरात्रीच्या सुमाराला अंबरनाथच्या लादी नाका परिसरात टेम्पोच्या बोनेटमधून अचानक धूर येऊ लागला. चालकाने टेम्पो रस्त्यातच सोडून बाहेर पळ काढला. यानंतर काही क्षणातच टेम्पोने पेट घेतला. याबाबत अंबरनाथ अग्निशमन दलाला माहिती मिळताच जवानांनी घटनास्थळी धाव घेत टेम्पोला लागलेली आग नियंत्रणात आणली. या घटनेत कुणालाही इजा झालेली नसली, तरी टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.