त्रिपुरारी पौर्णिमानिमित्त बाणगंगा महाआरती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

त्रिपुरारी पौर्णिमानिमित्त बाणगंगा महाआरती
त्रिपुरारी पौर्णिमानिमित्त बाणगंगा महाआरती

त्रिपुरारी पौर्णिमानिमित्त बाणगंगा महाआरती

sakal_logo
By

मुंबादेवी, ता. ३ (बातमीदार) : गौड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्टच्या वतीने ७ नोव्हेंबरला त्रिपुरारी पौर्णिमानिमित्त दक्षिण मुंबईतील वाळकेश्वर येथील बाणगंगा येथे महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. ही माहिती गौड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्ट (जीएसबी) अध्यक्ष प्रवीण कानविन्दे यांनी दिली.
या वेळी ऊर्जा फाऊंडेशन व अखिल वीरशैव लिंगायत महासंघाचे प्रमुख डॉ. विजय जंगम (स्वामी) व हिंदू जनजागृती समितीचे सागर चोपदार यांनी या बाणगंगा महा आरतीसाठी सहभाग घेऊन पाठिंबा दिला आहे.
गौड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्ट ही मुंबईतील १४० वर्षे जुनी संस्था असून भुलेश्वर महादेव, श्रीवालुकेश्वर महादेव, श्री शांतादुर्गा व शितळादेवी माहीम आणि बाणगंगा परीक्षेत्र ही मंदिरे व इतर अनेक मंदिरे व परिसर या ट्रस्टच्या मालकीच्या आहेत. यापैकी वालुकेश्वर (वाळकेश्वर) हे पौराणिक व अति प्राचीन मंदिर असून सालाबादप्रमाणे या वर्षीदेखील त्रिपुरारी पौर्णिमेच्या (कार्तिक पौर्णिमा) मुहूर्तावर सायंकाळी सहा वाजता वाळकेश्वर महादेव मंदिरासमोर बाणगंगा तीर्थक्षेत्री बाणगंगा महाआरतीचे आयोजन ट्रस्टतर्फे केले आहे. या महाआरतीसाठी हजारो दिव्यांची आरास करण्यात येते व विशेष म्हणजे वाराणसीच्या धर्तीवर महाआरती व गंगापूजन केले जाते. या नयनरम्य व अद्‌भूत भक्तिपूर्ण वातावरणाचे साक्षीदार बनण्यासाठी मुंबईकरानी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन ट्रस्टने केले आहे.

यांची असेल विशेष उपस्थिती
उज्जैन पीठाचे जगद्गुरु सद्धर्मसिंहासनाधिश्वर श्री श्री श्री १००८ जगद्गुरु राजदेशीकेंद्र सिद्धलिंग शिवाचार्य भगवत्पाद महास्वामीजी (उज्जैनी सद्धर्म पीठ कर्नाटक आणि उज्जैन पीठ मध्य प्रदेश) यांची विशेष उपस्थिती असेल. सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री दीपक केसरकर, मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

फोटो व रील स्‍पर्धा
त्रिपुरारी पौर्णिमानिमित्त फोटो व रील स्‍पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्यांस ट्रस्टतर्फे पारितोषिके देण्यात येतील. तसेच बाणगंगा तीर्थक्षेत्र कॉरिडॉर बनविण्याचा ट्रस्टचा मानस असल्याची माहिती ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी ऋत्विक औरंगाबादकर यांनी दिली आहे.