भिवंडीत जबरी चोरी करणारे गजाआड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडीत जबरी चोरी करणारे गजाआड
भिवंडीत जबरी चोरी करणारे गजाआड

भिवंडीत जबरी चोरी करणारे गजाआड

sakal_logo
By

भिवंडी, ता. ३ (बातमीदार) : शहरातील पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने जीवे मारण्याची सुपारी घेतल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून दोघांना शस्त्रासह अटक केली. शहरातील भादवड गावात पोलिसांची शासकीय वसाहत असून, सोनाळे येथे औद्योगिक इंडस्ट्री आहे. त्यामुळे या मार्गावरून नेहमी नागरिकांची वर्दळ असते. अशा स्थितीत भादवड नाका ते सोनाळे भागात रस्ता निर्मनुष्य झाल्यानंतर दोन जण पिस्‍तूलचा धाक दाखवत वाटमारी करीत होते. या प्रकरणी खबर मिळाल्यानंतर पोलिस पथकाने भादवड गावातील लक्ष्मण चौकात सापळा रचून आशीष आदित्यनाथ श्रीवास्तव (३६) व शुभम वीरेंद्र मिश्रा (२५) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गावठी बनावटीचे पिस्‍तूल, काडतूस, मोटारसायकल असा एकूण ८२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक नीलेश जाधव हे करीत आहेत.