जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप विषयावर आज परिसंवाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप विषयावर आज परिसंवाद
जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप विषयावर आज परिसंवाद

जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप विषयावर आज परिसंवाद

sakal_logo
By

बोर्डी, ता. ३ (बातमीदार) : ‘जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप’ या विषयावर शनिवारी (ता. ४) सायंकाळी साडेसहा वाजता परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. सोमवंशी क्षत्रिय समाज शिक्षण उन्नती महिला मंडळाच्या गजीताई सावे स्मारक सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. खगोल शास्त्रज्ञ अथर्व पाटील हे या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. खगोलशास्त्राविषयी सर्वसामान्यांच्या ज्ञानात भर पडावी आणि विज्ञान युगात चाललेल्या घडामोडीची माहिती मिळावी या दृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील विद्यार्थी, पालक व हौशी नागरिकांनी या परिसंवादाचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन अथर्व पाटील यांनी केले आहे.