आकुर्ली मार्गावरील गतीरोधकांची दुरवस्‍था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आकुर्ली मार्गावरील गतीरोधकांची दुरवस्‍था
आकुर्ली मार्गावरील गतीरोधकांची दुरवस्‍था

आकुर्ली मार्गावरील गतीरोधकांची दुरवस्‍था

sakal_logo
By

कांदिवली, ता. ३ (बातमीदार) ः कांदिवली पूर्वकडील आकुर्ली या एकमेव अरुंद मुख्य मार्गावरील तब्बल तीन गतिरोधकांची दुरवस्‍था झाली आहे. अर्धवट असलेल्‍या या गतिरोधकांमुळे अनेकदा वाहनचालकांची गफलत होते. त्‍यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गतिरोधकांचे नूतनीकरण करा, अन्‍यथा काढून टाका, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
कांदिवली पूर्वेला स्टेशनपासून द्रुतगती मार्गाकडे व इतर विभागात जाण्यासाठी आकुर्ली हा एकमेव मुख्य अरुंद मार्ग आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. या मार्गावर दक्षिणमुखी हनुमान मंदिर, महापालिका शाळा, हनुमान नगर आणि महिंद्रा येलो गेटसमोरील गतिरोधक तुटले असून त्‍याचे दोन ते तीन भाग झाले आहेत. तीनही महत्त्‍वाच्या ठिकाणी असलेल्‍या गतिरोधकांकडे पालिकेने दुर्लक्ष केले असल्‍याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
दरम्‍यान, गेल्‍या चार महिन्यांपासून आकुर्ली मार्गावर असलेल्या या गतिरोधकांच्‍या दुरवस्थेमुळे दुचाकीस्वार, रिक्षाचालकांची गफलत होते. चारचाकी वाहने एका बाजूने वाकडी होतात तर अवजड वाहने आदळली जातात. यामुळे अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चार महिन्यांपासून तुटलेल्या गतिरोधकामुळे वाहनचालक हैराण झाले आहेत. रोज प्रवास करताना याचा त्रास होतो. हे गतिरोधक नव्‍याने बनवावेत, अथवा काढून टाकावेत.
- गणेश पावडे, वाहनचालक

दोन दिवसांत गतिरोधक व्‍यवस्थित करण्यात येतील. अभियंत्यांना सांगून या गोष्‍टीचा पाठपुरावा करतो.
- समीर सानप, दुय्यम अभियंता, आर/दक्षिण विभाग