डॉक्टरांच्या कलागुणांसाठी ‘आर्ट शो’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉक्टरांच्या कलागुणांसाठी ‘आर्ट शो’
डॉक्टरांच्या कलागुणांसाठी ‘आर्ट शो’

डॉक्टरांच्या कलागुणांसाठी ‘आर्ट शो’

sakal_logo
By

शिवडी, ता. ३ (बातमीदार) ः मुंबई व महाराष्ट्रातील व्यावसायिक डॉक्टरांनी छंद म्हणून जोपासलेल्या दर्जेदार कलाकृतींना कलाक्षेत्रात वाव मिळावा, तसेच त्यांच्या कलाकृतींतून सामाजिक कार्यास हातभार लाभावा, या हेतूने दीपकला फाऊंडेशनतर्फे ‘डॉक्टर्स आर्ट शो’चे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन २२ ते २८ नोव्हेंबर रोजी मुंबईतील वरळी येथील नेहरू सेंटर आर्ट गॅलरीमध्ये भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनामध्ये मुंबई व महाराष्ट्रातील व्यावसायिक डॉक्टरांनी छंद म्हणून जोपासलेल्या फोटोग्राफी, चित्रकला, शिल्पकला इत्यादी कलाकृतींचा समावेश करण्यात येणार असून कला आणि विज्ञान यांचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. तरी इच्छुक डॉक्टरांनी आपली कला सादर करण्यासाठी ९८९२०११६९६ या क्रमांकावर किंवा deepkalafoundation@gmail.com संपर्क साधावा, असे आवाहन दीपकला फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे.