दाभोण येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोण येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम
दाभोण येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम

दाभोण येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम

sakal_logo
By

कासा, ता. ३ (बातमीदार) ः नॅशनल लिगल सर्व्हिसेस अथॉरिटी, सुप्रीम कोर्ट आणि डहाणू व तलासरी तालुका ॲडव्होकेट बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम पार पडला. डहाणू तालुक्यातील दाभोण येथील संत गाडगेबाबा महाराज आश्रमशाळेत याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात महिलांचे कायदे, बचत गट मार्गदर्शन, आदिवासी समाजासाठी असलेल्या विविध योजना, आदिवासींचे हक्क व अधिकार, लोक अदालत, कुळ कायदा, ॲट्रोसिटी कायदा, संविधानातील ५ वी/६ वी अनुसूची याविषयी ॲड. विराज गडग यांनी मार्गदर्शन केले. तसेच जन्म-मृत्यू नोंद /दाखले कसे मिळवावे याविषयी ॲड. मीरा मांगेला मार्गदर्शन यांनी केले. आपापसातील वाद, भांडण लोकअदालतमध्ये येऊन कसे मिटविता येतील, याविषयी डहाणू बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. भरत माच्छी यांनी मार्गदर्शन केले. जीवन जगत असताना महिलांनी पुढे येऊन आपल्या हक्क, अधिकाराविषयी लढायला शिकले पाहिजे. गोरगरीब जनतेला आम्ही आमच्या न्यायालयाच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याकरिता सर्वतोपरी सहकार्य करू, असे मार्गदर्शन सहदिवाणी न्यायाधीश डी. एम. गुलाठी यांनी केले. याप्रसंगी न्यायाधीश वाय. जे. वळवी, ॲड. भरत माच्छी, ॲड. दिनेश वंजारी, ॲड. विराज गडग, ॲड. मीरा मांगेला, ॲड. सुयोग माच्छी, वाणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी न्यायालयाचे पीएलव्ही म्हणून काम करणारे सिकिंद करमोडा यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले. यासाठी गावातील महिला, युवावर्ग, प्रतिष्ठित नागरिक हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन न्यायालयाचे वरिष्ठ लिपिक मोगरे यांनी केले.