सातपाटीमधील मच्छीमारांच्या समस्या सोडवू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सातपाटीमधील मच्छीमारांच्या समस्या सोडवू
सातपाटीमधील मच्छीमारांच्या समस्या सोडवू

सातपाटीमधील मच्छीमारांच्या समस्या सोडवू

sakal_logo
By

पालघर, ता. ३ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील सातपाटीच्या मच्छीमारांच्या समस्या सोडवण्यास आम्हा तत्पर आहोत. तसेच सातपाटी मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्था आणि सातपाटी फिशरमेन सर्वोदय सोसायटी यांच्याशी समस्यांबद्दल तपशीलवार चर्चा करू असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
भेटीला गेलेल्या सातपाटी मधील मच्छीमार संस्थातील पदाधिकाऱ्यांना दिले
माजी राज्यपाल राम नाईक यांच्या मध्यस्थीने उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या भेटीवेळी सातपाटी संस्थांचे पदाधिकारी राजेंद्र मेहेर, रवींद्र म्हात्रे, मुकेश मेहेर, केदारनाथ म्हात्रे उपस्थित होते. मच्छीमार सहकारी संस्थांचा डिझेल परतावा मिळत नसल्याची तक्रार उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर मांडण्यात आली. निश्चित आकडेवारी दिल्यास ते तपासून घेऊन योग्य परतावा देण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले. इतरही मच्छीमारांच्या समस्या त्यांनी या प्रतिनिधीकडून ऐकून घेतल्या व या सर्व समस्या चर्चेने सोडविल्या जातील, असेही सांगितले.
या भेटीदरम्यान स्वातंत्र्यलढ्यात सातपाटीच्या ४७ स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या कार्याची माहिती देणारी पुस्तिका हुतात्मा स्मारक समितीचे प्रतिनिधी मुकेश मेहेर यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना भेट म्हणून दिली. तसेच तुंगारेश्वर पर्वतावरील बालयोगी सदानंद महाराज यांच्या आश्रमातील मंदिर आणि जमिनीच्या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री सुधीर मनगुंटीवार यांना दिलेल्या निवेदनाची प्रत उपमुख्यमंत्र्यांना केदारनाथ म्हात्रे यांनी दिली. यासाठी चर्चा करून निर्णय घेण्याबद्दलचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.