वरळीत आजपासून कोळी खाद्य महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वरळीत आजपासून कोळी खाद्य महोत्सव
वरळीत आजपासून कोळी खाद्य महोत्सव

वरळीत आजपासून कोळी खाद्य महोत्सव

sakal_logo
By

प्रभादेवी, ता. ३ (बातमीदार) : समुद्राच्या फेसाळणाऱ्या लाटा आणि थंड हवेची झुळूक घेत झिंगा फ्राय, गरमागरम बोंबील, झणझणीत तिखले, भरलेले खेकडे याचा आस्वाद वरळीत कोळी महोत्सवात खवय्यांना घेता येणार आहे. शुक्रवार ४ ते रविवार ६ नोव्हेंबरपर्यंत सायंकाळी सात ते ११ या वेळेत वरळी सिफेस येथील बिंदू माधव चौकासमोर कोळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईचा आद्य नागरिक म्हणून ओळख असलेल्या कोळी समाजाचे विविध प्रकारचे मसाले, त्यांनी बनवलेले मासे अशा वेगवेगळ्या खमंग पदार्थांची लज्जत चाखण्यासाठी खवय्यांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन वरळी सागरी कोळी महोत्सव समितीचे अध्यक्ष अभिजित पाटील व आयोजक आकर्षिका पाटील यांनी केले आहे.