क्लबच्या मॅनेजर, बाउन्सरकडून ग्राहकांना मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्लबच्या मॅनेजर, बाउन्सरकडून ग्राहकांना मारहाण
क्लबच्या मॅनेजर, बाउन्सरकडून ग्राहकांना मारहाण

क्लबच्या मॅनेजर, बाउन्सरकडून ग्राहकांना मारहाण

sakal_logo
By

ठाणे, ता. ३ (वार्ताहर) : वाढदिवस साजरा करण्यासाठी झोयो क्लबमध्ये आलेल्या तरुणांना व्यवस्थापक आणि बाउन्सर यांनी मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली आहे. या प्रकरणी क्लबच्या व्यवस्थापकासह १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. देव नीलेश शहा (वय १९, रा. सर्वोदय नगर, मुलुंड पश्चिम) हा त्याचा मावसभाऊ शुभ शहा याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने २८ ऑक्टोबर रोजी झोयो क्लबमध्ये मित्र परिवारासह आले होते. रात्रीच्या वेळी पार्टी सुरू असताना एक जण चक्कर आल्याने पडला. त्याला घेऊन क्लबमध्ये जाताना मॅनेजर फिलिक्स याने अडवले. त्यावरून शाब्दिक चकमकीनंतर फिलिक्सने बाउन्सर बोलावून देव शहा याच्यासह त्याच्या भावाला मारहाण केली. या प्रकरणी राबोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.