म्हसळा तालुक्यात १५९ जणांना दंश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

म्हसळा तालुक्यात १५९ जणांना दंश
म्हसळा तालुक्यात १५९ जणांना दंश

म्हसळा तालुक्यात १५९ जणांना दंश

sakal_logo
By

म्हसळा (बातमीदार)ः तालुक्यात विंचू-सर्प दंशाच्या घटनांत वाढ झाली आहे. दोन महिन्यांच्या कालावधीत म्हसळा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात १५९ घटनांची नोंद झाली आहे. त्यामध्ये ७६ घटना विंचू-सर्प आणि अन्य दंशाच्या आहेत; तर विंचू ३२, सर्पदंश ११ आणि कुत्रा दंश २७ घटना असून उर्वरित मधमाशी, अन्य किटक, मांजर आणि उंदीर दंश घटना आहेत. सध्या वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. रात्री पडणारी थंडी आणि दिवसा उष्ण वातावरणामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढला आहे. अशातच भातकापणीच्या कामांना सुरुवात झाल्याने साप आणि विंचू दंश होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. त्यामुळे साप किंवा विंचू दंश झाल्यास तत्काळ ग्रामीण रुग्णालय किंवा जवळच्या प्रा. आ. केंद्रात तत्काळ दाखल होण्याचे आवाहन डॉ. सागर काटे यांनी केले आहे.